नगरसेविका निर्मला कुटे यांच्याकडून पिंपळेसौदागरमध्ये आयोजित कराटे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
938

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. ४) पिंपळेसौदागर ज्युदो-कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपळेसौदागर आणि रहाटणी परिसरातील सुमारे ५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

ही स्पर्धा पृथ्वीराज गार्डनमध्ये पार पडली.  शीतो-रियोसीको-काय कराटे-डु आसोसीएशनने स्पर्धेचे नियोजन केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र पोलीस कराटे कोच शिहान कैलास लबडे पाटील, प्रगतशील शेतकरी शिवनाथ काटे, पवना सहकारी बॅकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्तात्रय झिंझुर्डे, राजू कुटे, चंद्रकांत कुटे, चिंधा कुटे, अण्णा शेलार, उद्योजक संजय भिसे, संजय कुटे,राकेश भास्कर,फडनीस, अनय मुळे, संतोष सिंग यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंना नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चषक, मेडल्स व प्रमाणपत्र देण्यात आले

नगरसेविका निर्मला कुटे म्हणाल्या, “स्पर्धेस खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुलांनी मैदानी खेळाला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारच्या आउटडोर, मैदानी खेळांचे आयोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.”