नक्षलवादी भूसुरुंग स्फोटातील आरोपी निघाला राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष

0
614

मुंबई, दि ६ (पीसीबी) – जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान १ मे ( महाराष्ट्रदिनी ) झालेल्या भूसुरुंग स्फोट प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला आरोपी कैलास प्रेमचंद रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याचे वृत्त आले आहे. या स्फोटात १५ पोलिसांसह १६ जण ठार झाले होते.

नक्षलवाद्यांनी ३० एप्रिलच्या रात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने तसेच अन्य यंत्रसामग्री जाळली होती. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. यात १५ पोलिस शहीद तर एका चालकाचा मृत्यू झाला होता.

विशेष म्हणजे या नक्षलीहल्या प्रकरणी पोलिसांनी कैलास प्रेमचंद रामचंदानी यांना यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान कैलास प्रेमचंद रामचंदानी हे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. या चर्चे नंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.