जर मी मनातही आणले असते ना; तर तीनही राणे जेलमध्ये असते

0
1679

मुंबई, दि ६ (पीसीबी) – मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. यामुळे त्यांना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच नितेश राणेंवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशावरुन कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. याला केसरकर यांनी उत्तर दिले आहे.

केसरकर यांनी ‘नितेश राणे यांनी जे कृत्य केलं, ते सत्कर्म होतं का? व्हिडीओ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय. राणेंवर कारवाई करायला मी कोण आहे? कारवाईसाठी न्यायालयाचेच आदेश आहेत, असं स्पष्ट केले. तसेच राणेंवर गुंडगिरी, खंडणीचे गुन्हे आहेत. चिंटू शेख प्रकरण आहे. मला राजकारण करायचं असतं तर राणेंच्या केसेसचा फॉलोअप केला असता आणि सर्व राणे आज जेलमध्ये गेले असते, असंही दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान, केसेकर यांनी पुढे बोलताना उपअभियंते शेडेकर यांना अपमानित करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? त्यांनी आत्महत्या केली असती तर पुढे काय झालं असतं? तुम्ही कामातल्या चुका दाखवा, आम्ही अभियंत्यांना सस्पेंड करु अस केसरकर म्हणाले आहेत.