धनगर समाज कृतीतून शरद पवारांना जागा दाखवेल – गोपीचंद पडळकर

0
965

सोलापूर, दि. २ (पीसीबी) – शरद पवार साहेबांच्या राजकारणात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. राष्ट्रवादीला मजबूत  करण्यासाठी धनगर समाजाने पहिल्यापासून  आधार दिला आहे . मात्र, आता धनगर समाज सुज्ञ झाला आहे. त्यामुळे लोक आता त्यांना कृतीतूनच त्यांची जागा दाखवतील, असे इशारा धनगर नेते  गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करमाळा येथे धनगर आरक्षणा संदर्भात केलेल्या विधानावरून धनगर नेत्यांनी  आक्रमक  पवित्रा घेतला आहे. आजवर पवार साहेबांच्या जे पोटात होत ते ओठावर आले आहे, आजवर त्यांची भूमिका धनगर समाजाच्या बाबतीत अशीच उदासीन राहिली आहे. पवार हे आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक असणार नाहीत,  हे  त्यांच्या विधानावरून  स्पष्ट झाले आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी  म्हटले आहे.

दरम्यान,  करमाळा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. धनगर समाज मते दुसऱ्याला देतो आणि प्रश्न मला सोडवायला सांगतात,  असे पवार म्हणाले  होते.  पवार यांच्या या विधानावरून धनगर समाजातील नेत्यांनी  टीका सुरू  केली  आहे.