धनंजय मुंडेंना पुन्हा कोरोनाची लागण

0
179

मुंबई,दि.२४(पीसीबी) – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर मुंडे यांनी पुन्हा आपल्या कामास सुरूवात केली होती. त्यानंतर आता पुन्हा धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे.

माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.

“माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.