धक्का: एअर इंडियाचे लवकरच खासगीकरण होणार; उड्डाण मंत्र्यांची घोषणा

0
355

दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – देशाची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले असून ही कंपनी विकत घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज (गुरुवार) स्पष्ट् केले.

पुरी म्हणाले, “एअर इंडियाचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे शक्य तितक्या कमीत कमी वेळेत आम्हाला चांगला व्यवहार करायचा आहे. त्याकरीता वैकल्पिक यंत्रणा तयार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत कॅबिनेट सचिवालय स्तरावर बैठकही पार पडली आहे. कंपनीचे संपूर्ण खाजगीकरण कमीतकमी वेळेत आणि उत्तम सौद्याद्वारे केले जाईल. लोक एअर इंडिया घेण्यास उत्सुक आहेत कारण ती अव्वल दर्जाची विमान कंपनी आहे. जो कोणी एअर इंडिया खरेदी करेल तो खूप भाग्यवान असेल आणि खासगी क्षेत्रातील मजबूत तत्वांनुसार ते चालवण्यास सक्षम असेल.