धक्कादायक: हिंजवडीत महिलेच्या डोक्याला रिव्हॉलवर लावून केस मागे घेण्याची धमकी

0
1900

हिंजवडी, दि. ११ (पीसीबी) – एका महिलेच्या डोक्याला रिव्हॉलवर लावून, “तु माझ्या विरुध्द केलेल्या सर्व केसेस मागे घे, नाहीतर तुला खल्लास करेन, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हिंजवडी टाउनशिपजवळ म्हाळुंजी येथे घडली.

याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शिखर शरद सिंग (वय ३०, रा. हिंजवडी. मुळ रा. न्यू नारायणनगर, लखनऊ, उत्तर प्रदेश) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांच्या मुलासोबत चहा पिण्यासाठी हिंजवडी टाउनशिप म्हाळुंजी परिसरात आल्या होत्या. यावेळी दुचाकीवरुन एका मुलीसोबत आरोपी शिखर सिंग तेथे आला. त्याने महिलेच्या डोक्याला रिव्हॉलवर लावून, “तु माझ्या विरुध्द केलेल्या सर्व केसेस मागे घे, नाहीतर तुला खल्लास करेन अशी धमकी दिली आणि दुचाकीवरुन मुलीसह पसार झाला. फिर्यादी महिला घाबरली असल्याने तिने गुरुवारी (दि.१०) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक गभाले तपास करत आहेत.