धक्कादायक: संत तुकारामनगरमध्ये भांडणा दरम्यान चामडी पट्याचा डोळ्यावर मार लागल्याने तरुण झाला दृष्टीहीन

0
311

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – भांडणाच्या रागातून चौघाजणांनी मिळून एका तरुणाला चामडी पट्याने मारहाण केली. यामध्ये तरुणाच्या डाव्या डोळ्यावर जबर मार बसला. यामुळे त्या तरुणाला त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली आहे. ही हळहळ व्यक्त होणारी घटना रविवार (दि.२८ एप्रिल) रोजी संत तुकारामनगर येथील अहिल्या देवी होळकर मैदानाजवळ घडली.