धक्कादायक: मराठी अभिनेत्रीने मुलीची हत्या करुन स्वत:ही केली आत्महत्या

0
741

ठाणे, दि. १२ (पीसीबी) – एका मराठी अभिनेत्रीने मुलीची हत्या करुन स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ठाण्यामधील कळवा येथे घडली.

अभिनेत्री प्रज्ञा पारकर (वय ४०) आणि मुलगी श्रृती (वय १७) असे मयत दोघा मायलेकींचे नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञाकडे काही काम नव्हते तसेच तिच्या पतीच्या व्यवसायात हवी तशी प्रगती होत नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती, असे तिने लिहेलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. रविवारी सकाळी पती जिमला गेल्यानंतर प्रज्ञाने प्रथम मुलगी श्रृतीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चेही जीवन संपवले. पती घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून प्रज्ञा यांनी हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रज्ञाने काही मराठी मालिकांमध्ये तसेच एका मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले होते.