धक्कादायक: भोसरीत फासावर दिलेल्या त्या दोघा चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार

0
955

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – दिघी रोडवरील नूर मोहल्ल्यात रविवारी दुपारच्या सुमारास महिलेने पोटच्या दोन मुली आणि एक मुलला गळफास देऊन खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून शवविच्छेदन आहवालामध्ये फास दिलेल्या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.  

अत्याचार झालेली एक मुलगी ७ तर दुसरी मुलगी ९ वर्षांची होती. शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलेल्या या धक्कादायक माहितीमुळे या प्रकरणाला वेगळेच वळन लागले आहे. मुलींवर अत्याचार कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. भोसरी पोलिस तपास करत आहेत.