धक्कादायक: बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहातच बलात्कार

0
433

बारामती, दि. २ (पीसीबी) – एका माध्यमिक विद्यालयातील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२८) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीने बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शाळेतील दोघा आरोपी विद्यार्थ्यांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबांधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बारामती शहरातील एका  माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते. आरोपी ही याच माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतात. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास आरोपीने विद्यालयाच्या स्वच्छतागृहामध्ये या मुलीवर बलात्कार केला. तर त्याला दुसऱ्या एका विद्यार्थ्याने मदत केल्याची तक्रार या विद्यार्थिनीने केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी शेंडगे अधिक तपास करत आहेत.