दोन ट्रकमध्ये कार सापडल्याने एकाच कुटूंबातील दहा जणांचा मृत्यू

0
1000

गुजरात, दि. ३१ (पीसीबी) –  दोन ट्रकमध्ये कार सापडल्याने एकाच कुटूंबातील तब्बल दहा जणांचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना रविवारी (दि.३०) गुजरातमधील कच्छ भचाऊ येथे झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीठाने भरलेल्या ट्रेलरने दुभाजक ओलांडला आणि चालक चुकीच्या दिशेने ट्रेलर नेऊ लागला. त्याचवेळी एसयूव्ही कारला त्याने धडक दिली. कारमधून एकूण ११ जण प्रवास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ट्रेलरने धडक दिल्यानंतर त्याचवळी मागून येणाऱ्या ट्रकनेही कारला ठोकले ज्यामध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व पीडित भचाऊ येथून गुजरातमधील आपल्या घरी भूज येथे चालले होते तेव्हा हा दुर्दैवी अपघात झाला.