देहुरोड शिवाजीनगर वसाहतीत दोन मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह

0
343

देहुरोड , दि.३० (पीसीबी) – देहुरोड शिवाजीनगर वसाहतीत दोन मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिवाजीनगर वसाहतीत घबराहट निर्माण झाली आहे.

देहुरोड कँन्टोन्मेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूगणालयातील कोरोना दक्षता पथक प्रमुख डॉ. सुनीता जोशी, व्ही एन जाधव यांनी देहूरोड शिवाजीनगर वसाहतीतील ऐका घरातील सशयीत कूंटूबातील 7 जणाना वाय,सी,एम रूगणालयात पाठविले होते. त्या पैकी 5 वर्ष वय व 11 वर्ष वयाच्या मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कूटुबातील पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचा कुटूबाच्या स आलेल्या शेजारी राहणारे 15 जणाना तपासणी साठी वाय सी एमला पाठविण्यात आले आहे त्यामुळे शिवाजीनगर वसाहत सिल करण्यात आले आहे, परवा पुण्यात जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांनी प्रशासकीय अधिकांर्याच्या बैठक घेतली त्या बैठकित पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे श्रावण हर्डीकर पुणे खडकी कँन्टोन्मेंट बोर्डचे कार्यकारी अधिकारी देहुरोड कँन्टोन्मेंट बोर्डाचे प्रतीनिधी म्हणुन देहुरोड कँन्टोन्मेंट बोर्ड डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाचे निवासी वैधकिय अधिकारी डॉ यामिनी अडबे उपस्थिति होते, जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांनी देहूरोड सह पिंपरी चिंचवड रेडझोन जाहीर केले आहे यांची दक्षता म्हणुन दिनांक 30 अप्रैल ते 3 मे पर्यत आप आपल्या हद्दीत ऐरिया सिल करून कडक निर्बंध घालण्यात यावे अशी सुचना केल्याने कँन्टोन्मेंट बोर्डाने विकासनगर, निगडी, चिंचोली या ठिकाणी सिमा सिल केले आहे