देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा अर्थसंकल्प – नरेंद्र मोदी

0
548

नवी दिल्ली, दि, ५ (पीसीबी) – आशा, विश्वास आणि अपेक्षांचा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं आहे. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहे काढणारा हा अर्थसंकल्प आहे यात काहीही शंका नाही. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांचीही प्रगती साधली जाईल. नवभारत निर्मितीच्या पथावर जाणारे हे बजेट आहे असेही मोदींनी म्हटले आहे.