देशात एक लाख रुग्णांचा टप्पा पार; महाराष्ट्रात ३५ हजार रुग्ण

0
385

पुणे, दि. 19 (पीसीबी) : भारतात कोरोना पाॅझिटीव रुग्ण प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. काल देशात एक लाख रुग्णांचा टप्पा पार झाला आहे. तर महाराष्ट्रात ३५ हजार कोरोना बाधिता रुग्णांचा टप्पा पार झाल आहे. देशात एकुण १ लाख ३२८ तर महाराष्ट्रात ३५ हजार ५८ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची संख्या आता झाली आहे. गेल्या ७२ तासात भारतात तब्बल १४ हजार ४७२ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली आहेत व त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात ५ हजार ९५८ रुग्णांची वाढ झाली आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया व ब्राझील मध्ये कोरोनाचा कहर वेगाने वाढु लागला आहे.

मे महीना सुरु होताच देशात व विशेषकरून महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. १ मे पासून देशातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६५ हजार ४६१ ने वाढली आहे व एकट्या महाराष्ट्रात २४ हजार ५६० रुग्ण वाढले आहेत. ६ % प्रतिदिन गतीने महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. शासनाच्या नवीन डिस्चार्ज पाॅलिसीमुळे महाराष्ट्रात एकुण २४ .०७ % रुग्ण बरे झाले आहेत. तसेच राज्यात आत्तापर्यंत १ हजार २४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे व मृत्यूचा दर ३.५६ % इतका आहे.