दिवसातून किमान एकदा तरी मला बाळासाहेबांची आठवण येते- छगन भुजबळ

0
465

मुंबई,दि.१७(पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७ वा स्मृतिदिन आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शिवाजीपार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ भावूक झालेले पहायला मिळाले.

दिवसातून किमान एकदा तरी मला बाळासाहेबांची आठवण येते, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही हे बाळासाहेबांचं वाक्य छगन भुजबळ यांनी ट्विट केलं आहे.