दिल्लीत भाजपला धक्का; खासदार उदित राज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
467

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) –  भाजपने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गायक हंसराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार उदित राज नाराज झाले असून त्यांनी आज ( बुधवारी) राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उदित राज हे दिल्लीतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत.  मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने उदित राज यांना डावलून गायक हंसराज यांना उमेदवारी दिली आहे.  भाजपने मला तिकीट नाकारुन अन्याय केला आहे.  २०१८ मध्ये अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात  मी आवाज उठवला होता. यामुळेच भाजप  माझ्यावर नाराज झाला असावा.

मी यापुढेही दलित समाजाच्या हितासाठी आवाज उठवतच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.  दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा प्रश्न उदित राज यांनी केला आहे.  दरम्यान, उदित राज हे दलित समाजातील नेते  आहेत. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी उदित राज यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे.