दिघी, चिखली मध्ये पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना..

0
199

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – दिघी आणि चिखली परिसरात पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये दररोज वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वरील दोन्ही घटनांप्रकरणी सोमवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत भगवान श्रीरंग नाईक (वय 34, रा. गजानन महाराज नगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी नाईक 12 मार्च रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास वाङमुखवाडी येथे जॉगिंग करत होते. ते बालाजी मंदिरासमोर आले असता एका मोपेड दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी नाईक यांचा 17 हजार 990 रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.दुस-या घटनेत सुजाता काळू सांगडे (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सांगडे 17 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासहा वाजता तळवडे जवळ रस्त्याने जात होत्या. त्या त्रिवेणीनगर चौकाजवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.