दिघीत मुलाच्या दुचाकीवरुन पडल्याने आईचा मृत्यू

0
514

दिघी, दि. २३ (पीसीबी) – मुलाच्या दुचाकीवरुन पडल्याने आईचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२०) दुपारी पावणेतीनच्या सुमारास वडमुखवाडी चऱ्होली येथे घडली.

संगीता किसन जाधव (वय ३५, रा. चऱ्होली, सिध्दी सोसायटीजवळ, भास्कर प्रभाकर तापकीर यांच्या खोलीत) असे मयत आईचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सुनील जाधव हा त्याची आई संगीता यांना त्याच्या दुचाकी (क्र.एमएच/२६/बीएम/४४६४) घेऊन चालला होता. ते वडमुखवाडी गोखले मळ्याजवळ पोहचले असता संगीता या दुचाकीवरुन खाली पडल्या. यामुळे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलिस तपास करत आहेत.