काका राज ठाकरेंकडून काय शिकलात? ; आदित्य ठाकरे म्हणतात…

0
859

अहमदनगर, दि. २३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून राजकारणातील कोणता धडा घेतला ?  या प्रश्नावर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे  यांनी  थेट उत्तर देत आपण आजोबा आणि वडिलांकडूनच राजकारणाचे धडे घेतले, असे उत्तर दिले. 

अहमदनगर येथे आदित्य ठाकरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने  काका राज ठाकरे यांच्याकडून काय शिकला, असा प्रश्न केला. यावर आदित्य ठाकरे यांनी सरळ उत्तर दिले.

आदित्य ठाकरे  यांनी सांगितलं की,  आपण वडील आणि आजोबांकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत. आजोबांनी मला एकदा एखादे काम करण्याचा निश्चय केला, तर मागे फिरायचे नाही,  अशी शिकवण दिली. तर वडिलांनी नेहमीच काम प्रामाणिकपणे करण्याचा तसेच खोटे बोलणे, नाटकं करु नये, अशी शिकवण दिली.

दरम्यान, आदित्य ठाकरे सध्या राज्यभर ‘जनआशीर्वाद’ यात्रेवर आहेत.  विविध शहरांमध्ये ते सभा घेत आहेत, त्यांच्या सभेला तरुणांचा चांगला मिळताना दिसत आहे. ते विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत आहेत.