“दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेटमध्ये तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेनमध्ये”

0
304

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : “माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेटमध्ये तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेनमध्ये लिहिलेला होता, त्यावेळी त्यांना काय आणि कसे फोन करुन त्रास दिला गेला, याची मी साक्षीदार आहे” अशी नकोशी आठवण यांनी सांगितली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. “दारु पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरुषार्थ उरला आहे का??? FIR होऊनही परिस्थितीत फरक पडला नाही” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास केलं होतं.

मैत्रिणींना येणाऱ्या फोन कॉल्सची आठवण
“मला आठवतंय मागे माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेटमध्ये, तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेनमध्ये लिहिलेला. त्यावेळी त्यांना काय आणि कसे फोन करुन त्रास दिला गेला, ज्याची मी साक्षीदार आहे. लढलेलो तेव्हाही. त्यांचा लढासुद्धा प्रस्थापितांविरोधात होता. लडेंगे..जितेंगे..” अशी आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली.

चित्रा वाघ यांना यापूर्वीही धमकी
चित्रा वाघ यांना पूजा चव्हाण प्रकरणात याआधीही धमकीचे फोन आले होते. “राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत” असं चित्रा वाघ त्यावेळी ट्विटरवर म्हणाल्या होत्या.