दर्जाहीन विनोदामुळे चित्रपटातले काम थांबवले होते- जॉनी लिव्हर

0
526

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात करणारे प्रसिद्ध अभिनेता जॉनी लिव्हर ‘एक टप्पा आऊट’ या मराठमोळ्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसणार आहेत. स्टँडअप कॉमेडीची आपण कधीच कदर केली नाही असे सांगतानाच दर्जाहीन विनोद आणि भूमिका येत असल्याने मध्यंतरी चित्रपटातले काम थांबवल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

‘तुमची सादरीकरणाची ऊर्जा संपली, विचार आणि कल्पनाशक्ती खुंटली, की कमरेखालच्या दर्जाहीन विनोदाकडे तुम्ही वळता. विनोद हा निखळ, निर्मळ आनंद देणारा असावा. मधल्या काळात मला व्हल्गर म्हणता येतील अशा भूमिकांसाठी विचारणा झालेली. म्हणूनच काम थांबवल होतं,’ विनोदवीर जॉनी लिव्हर त्यांच्या दीर्घकाळ घेतलेल्या ब्रेकबद्दल सांगतात.