थेरगावात दुचाकीला स्क्रॅच केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

0
653

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – दुचाकीला स्क्रॅच केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने बापलेकांनी एका तरुणाला सिमेंटचा गट्टू आणि कपडे धुण्याच्या धोपाटण्याने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना सोमवार (दि.८) सायंकाळी पाचच्या सुमारास थेरगावातील बालाजी कॉलनी येथे घडली.

विठ्ठल तुळशीराम हनुमंते (वय २३, रा. बालाजी कॉलनी, थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र लक्ष्मण डेंगळे (वय ४५), करण राजेंद्र डेंगळे (वय २२) आणि रोहित राजेंद्र डेंगळे (सर्व रा. बालाजी कॉलनी, थेरगाव) या तिघा बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विठ्ठल यांनी त्यांची दुचाकी घराबाहेर पार्क केली होती. यावेळी आरोपी बापलेकांच्या गाडीने विठ्ठल यांच्या दुचाकीला स्क्रॅच पाडले. यामुळे विठ्ठल यांनी याचा जाब आरोपींना विचारला. या गोष्टीचा राग आल्याने तिघा बापलेकांनी कपडे धुण्याच्या धोपाटन्याने आणि सिमेंटच्या गट्टूने विठ्ठल याला जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.