थेरगावमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

0
2014

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नोव्हेंबर २०१७ ते मे २०१८ दरम्यान थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी पिडित २५ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, परशुराम लक्ष्मण मोगल (वय २६, रा. तळोदा, रांजणी, नंदुरबार) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम आणि पिडित २५ वर्षीय तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नोव्हेंबर २०१७ ते मे २०१८ दरम्यान परशुराम याने तरुणीसोबत जवळीक वाडवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी परशुराम विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक गाडे अधिक तपास करत आहेत.