‘त्या’ चार जणी भारतीय टेबल टेनिसपटू ऑलिंपिकसाठी ठरल्या पात्र

0
525

नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) : एकाचवेळी भारताच्या चार टेबल टेनिसपटूंनी ऑलिंपिकसाठी पात्रात सिद्ध केली आहे. दोहा येथे पार पडलेल्या आशियाई पात्रता फेरीतून त्यांनी ही कामगिरी केली. या मध्ये जी. साथीयन, शरथ अचंता कमाल, सुतिर्थ मुखर्जी आणि मनिका बात्रा यांचा समावेश आहे.

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला साथीयन आशियाई गटाच्या पात्रता फेरीत अव्वल स्थानावर राहिला. या उपलब्धीबद्दल साथीयन याने समाधान व्यक्त केले आहे. तो म्हणाला,’ऑलिंपिकसाठी पात्र ठरणे हे लहानपणापासूनचे स्वप्न होते. माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम क्षण आहे. क्रीडा क्षेत्रातील एका मोठ्या स्पर्धेत मला खेळायला मिळणे हा माझ्यासाठी बहुमान आहे.’साथीयन सध्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. अर्थात, दुखापत मोठी नाही. पुरेशा विश्रांतीनंतर मी शंभर टक्के तंदुरुस्त होईन आणि पूर्ण क्षमतेने सरावाला सुरवात करेन, असा आ्मविश्वासही त्याने व्क्त केला.

महिला एकेरीत सनसनाटी निकाल नोंदवताना सुतिर्थाने भारताच्याच मनिकाचा ७-११, ११-७, ११-४, ४-११, ११-५, ११-५ असा पराभव केला. दक्षिण आशियाई गटातून सुतिर्था आणि मनिका दोघीच पात्रतेच्या शर्यतीत होत्या. सुतिर्थाने विजयासह, तर मनिकाने जागतिक मानांकनानुसार आपली पात्रता सिद्ध केली.

पुरुष एकेरीत शरथने आधी पाकिस्तानच्या रमीझ मुहंमद याचा ४-० असा पराभव केला. त्यानंतर त्याने शरथ कमाल याचे आव्हान संपुष्टात आणले. शरथविरुद्ध साथियनने सुरवातीच्या दोन गेम जिंकून झकास सुरवात केली होती. पण, त्यानंतर अनुभवी शरथने सलग तीन गेम जिंकताना ३-२ अशी आघाडी मिळवली. साथीयने या वेळी पिछाडीचे दडपण न घेता पुढील दोन गेम जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे यावर्षी राष्ट्रीय विजेतेपदही त्यानेच मिळविले आहे. त्याच्या या कामगिरीचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया त्याचे प्रशिक्षक एस.रामन यांनी व्यक्त केली.

साथीयनकडून पराभव पत्करावा लागल्यावर शरथचे ऑलिंपिकस्थान धोक्यात आले होते. त्याला पाकिस्तानच्या रमीझविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक होते. पण, अनुभवी शरथला हा अडथळा पार करणे फार जड गेले नाही. त्याने रमीझचा सलग चार लढतीत पराभव केला. शरथ चौथ्यांदा ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे. वयाच्या ३८व्या वर्षी देखिल पूर्ण तंदुरुस्तीत खेळू शकतो हे आपण दाखवून दिले आणि यासाठी खरे तर भारताच्या युवा पिढीचा मोठा हात आहे. तो म्हणाला,”साथीयन, हरमीत देसाई या युवा खेळाडूंनी मला या वयात देखील खेळण्यासाठी प्रेरित केले. ते स्वतः खूप मेहनत घेतात आणि मला घेण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचे प्रोत्साहनच मला खेळण्याची जिद्द देते.”

कशी झाली पात्रता
आशियाई पात्रतेसाठी खेळाडूंना पाच गटात विभागण्यात आले होते. भौगोलिक परिस्थितीनुसार हे गट तयार करण्यात आले. यामध्ये दक्षिण आशिया, मध्य आशिया, पूर्व आशिया, दक्षिणपूर्व आशिया आणि पश्चिम आशिया असे पाच गट करण्यात आले. पण, पश्चिम आशियातील खेळाडू यापूर्वीच पात्र ठरले असल्याने ते स्पर्धेत उतरले नाहीत. या पाचही गटातील विजेते ऑलिंपिकसाठी पात्र ठरले, तर सहाव्या खेळाडूची जागा ही सर्वोत्तम मानांकित खेळाडूच्या समावेशाने भरून काढण्यात आली.