…त्यामुळे मी पुण्याच्या बाहेरचा नाही – चंद्रकांत पाटील  

0
364

पुणे, दि. २ (पीसीबी) – पुणेकरांचे आणि माझे खूप जुने आणि घनिष्ठ नाते आहे. माझी पत्नी पुण्याची आहे. शिवाय मी पुण्यात विद्यार्थी सेनेत कार्यरत होतो. त्यामुळे मी पुण्याच्या बाहेरचा नाही. मी तुमच्यापैकीच एक आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट करत  आपल्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कोथरूडमधून त्यांच्या नावाला विरोध झाला होता. ‘दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते.

या पोस्टरला आणि विरोधाला चंद्रकांत पाटील यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिले आहे. ‘मी पुण्याचा, मी महाराष्ट्राचा, मी अवघ्या देशाचा आहे’, असे पाटील यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच पुणेकरांना मतदान करण्याचे आवहन केले आहे.