तेजस्विनी कदम यांच्या नेतृत्वामूळे युवतींना भाजप युवा मोर्चा पिं.चिं.शहर मध्ये मोठे स्थान; नियुक्ती जाहीर

0
316

पिंपरी,दि.२५(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे संघटन मजबूत करण्यावर आमचा भर असून त्या दृष्टीने विविध भागातील युवतींचे एकत्रीकरण करून पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे मत पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात तेजस्विनी कदम यांनी मांडले. शहरातील युवा मोर्चाच्या नियुक्त्या नुकत्याच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जाहीर केल्या.

पक्षाच्या युवा / युवती मोर्चाच्या जिल्हा युवती सह संयोजिका म्हणून सारिका माळी तर आरती अभिजित यांची युवा मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. या नव्या कार्यकारिनित अँड.प्रियांका जाधव काटकर कार्यकारिणी सदस्य, रोहिणी डुंबरे निगडी चिखली मंडळ चिटणीस, शुभांगी कसबे पिंपरी दापोडी मंडळ सरचिटणीस, नम्रता अलंकार मंडळ सरचिटणीस, सायली शहाणे प्राधिकरण चिंचवड मंडळ सरचिटणीस, नम्रता माळी मंडळ चिटणीस, अंकिता वारिएर मंडळ सरचिटणीस, श्रद्धा अस्टेकर केसकर चिंचवड किवळे मंडळ चिटणीस, धनश्री जुवेकर भोसरी चरोली मंडळ चिटणीस आदींचा समावेश असल्याची माहिती युवा मोर्चाच्या तेजस्विनीताई कदम यांनी दिली तसेच शहरातील बहुतेक भागात दांडगा जनसंपर्क ठेऊन सर्वच भागात युवतींचे संघटन मजबूत करण्यावर भर देऊन पक्षाची ध्येय धोरणे युवा मोर्चाच्या माध्यमातून जन सामान्यांपर्यंत पोहचवून कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.