‘तुम्हाला दहशतवाद परतायला हवा आहे का?’

0
377
मुंबई, दि.१२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. 
जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. ३७० कलम रद्द केल्यापासून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती व ओमर अब्दुल्ला यांच्यासह काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
यासंदर्भात शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह काही नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. बुधवारी (११ मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेतही शरद पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

याच पार्श्वभूमिवर केंद्र सरकारला शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काही नेत्यांनी पत्र लिहिले आहे. हाच मुद्दा पवार यांनी एका पत्रकार परिषदेतही उपस्थित केला. त्यावरून महाराष्ट्र भाजपाने ‘तुम्हाला दहशतवाद परतायला हवा आहे का?’ असा सवाल केला आहे.