तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड; संजय राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर

0
233

मुंबई,दि.२८(पीसीबी) – तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड. जे मनात येईल ते बोला, असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील… तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे संजय राऊत कर नाही त्याल डर असायचं कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या. भाजपावर हेतूवार आरोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा. कंपाउंडरकडून औषध घेताय आता एमडी डॉक्टरकडून घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल.” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

तसेच, “संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन करताय. चांगले आहे लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे. असं देखील भातळखर म्हणाले आहेत.”