‘तुझा संसार मोडतो’ असे म्हणत त्याने विनयभंग केला

0
441

चिखली, दि. ३ (पीसीबी) : ‘तुझा संसार मोडतो’ असे म्हणत पतीच्या मित्रानेच विवाहित महिलेचा विनयभंग केला.ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान मोरेवस्ती, चिखली येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेनं शुक्रवारी (दि.02) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश विश्वनाथ कदम (वय 36, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र आहे. आरोपी फिर्यादी महिलेचा पती घरी नसताना घरी जाऊन चहा, नाष्टा यांच्या निमित्ताने महिलेला स्पर्श करायचा. तसेच, ‘तुला माझ्याशी बोलू वाटत नाही का ? तुझ्या आणि माझ्यात जे सुरू आहे ते तुझ्या पतीला सांगून, तुझा संसार मोडतो’ अशी धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करीत आहेत.