तीन दशकात जगातील 10 देशांमध्ये पोहोचलेली मराठा सेवा संघ ही एकमेव संघटना – अँड. रानवडे

0
137

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – अकोला येथे ३२ वर्षांपूर्वी मराठा सेवा संघ या नावाने लावलेल्या रोपट्याने तालुका, जिल्हा , देश आदी आता जगातील 10 देशांमध्ये सांस्कृतिक संघटना म्हणून यश मिळविले असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे यांनी आज येथे केले.

संत तुकाराम नगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे मराठा सेवा संघाच्या ३२व्या वर्धापनदिना निमित्त मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सुरुवात रत्नप्रभा सातपुते यांच्या जिजाऊ वंदनाने सुरुवात केली. मराठा सेवा सेवा संघाचे उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव व पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व मराठा मोर्चाचे समन्व्यक राजेंद्र पुंजीर हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा भारतीताई भदाने यांनी डुंबरी समाजाच्या 86 वर्षाच्या शांताताई पवार या महिलेस जाहिर केलेले १० हजाराच्या बक्षीस जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे व प्रकाश जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापना केलेल्या या संघटनेचे ३६ कक्ष असून यामार्फत सामाजिक संघठन करत असताना शिवसेनेसारख्या राजकीय पक्षास बरोबर मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडने एकत्र काम सुरु असल्याची माहिती अँड रानवडे यांनी यावेळी केली .

या कार्यक्रमात प्रकाश जाधव , राजेंद्र पुंजीर , संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मनोज गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, यांनी मनोगत व्यक्त केले . या वेळी कायद्याकक्षाचे अध्यक्ष अँड श्रीराम डफळ, संत गाडगे बाबा प्रबोधन कक्षाचे अध्यक्ष, शोभा जगताप , ज्येष्ठ नागरिक जिल्हा अध्यक्ष सुभाष देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाल्मिकी माने , प्रकाश बाबर , सुरेश इंगळे , सौ. माणिक शिंदे , जयसिंग सासवडे, विजय शिंदे यांनी काम केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे सचिव सचिन दाभाडे यांनी केले . सूत्र संचालन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम यांनी केले तर आभार जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे मानले.