तिघेही आज एकत्र पाहायला मिळाले या भेटीनंतर नाराज खडसे, म्हणाले…

0
582

मुंबई, दि.३ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर, तिघेही आज एकत्र पाहायला मिळाले. या भेटीनंतर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भेटीमागचे कारण सांगितले.

‘जळगाव जि.प अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली. उमेदवार ठरवणं बाकी होतं. प्रदेशाध्यक्षांकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावं पाठवली होती. विरोधी पक्षनेते फडणवीसांची चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे खडसे म्हणाले.

आज आमची नाराजीबाबत चर्चाच झाली नाही, माझे पूर्वीपासून जे मत होते, ते आजही कायम आहे. नाराजीचा विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे. आज केवळ उमेदवारीवर चर्चा झाली,असे स्पष्टीकरण खडसेंनी दिले.