तळवडे येथील दिड लाखांचे प्लंबींगचे साहित्य चोरुन चोरटे पसार

0
457

तळवडे, दि. ३१ (पीसीबी) – तळवडे येथील एका बंगल्यात ठेवलेले १ लाख ५५ हजार ९८२ रुपयांचे प्लंबींगचे साहित्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना बुधवारी (दि.२९) रात्री बाराच्या सुमारास चिखली ते तळवडेकडे येणाऱ्या रोडवरील बंगल्यात घडली.

याप्रकरणी हर्षद सतीश भंडारी (वय २५, रा. रुपीनगर हौसिंग सोसाटी, रुपीनगर) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद यांचा चिखली पासून तळवडेकडे येणाऱ्या रस्त्यावर बंगला आहे. त्याठिकाणी त्याचे प्लंबींगचे काम सुरु आहे. यामुळे त्यांनी तेथे दिड लाखांचे प्लंबींगचे साहित्य आणुन ठेवले होते. बुधवारी रात्री हर्षद हे बंगल्यात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी तेथे ठेवलेले दिड लाखांचे प्लंबींगचे साहित्य चोरुन नेले. देहुरोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.