तळवडेतील तरुणीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल; तरुणाला अटक

2566

निगडी, दि. २१ (पीसीबी) – तळवडे येथील एका २३ वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ एका तरुणाने तिच्या वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले तसेच तिच्या मामाच्या फेसबुक अकाऊंटवर टॅग करुन तिची बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार (दि.२०) रात्री अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित २३ वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार आकाश करम गंगावणे (वय २३, रा. संगम हौसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पीडित २३ वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आरोपी आकाश याने तरुणीच्या वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले तसेच तिच्या मामाच्या फेसबुक अकाऊंटवर टॅग करुन तिची बदनामी केली. येवड्यावरच न थांबता आरोपी आकाश याने तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करुन तिची बदनामी केली. याप्रकरणी आकाश विरुध्द निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आकाशला अटक केली आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान आज (शुक्रवार) प्रेसनोटमध्ये याप्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून पोलिस हवालदार उत्तम कदम यांचा उल्लेख आहे. त्यांना माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांची बदली भोसरी पोलिस ठाण्यात झाली असल्याचे त्यांनी पीसीबीच्या प्रतिनीधीशी बोलताना सांगितले. यामुळे पोलिस आयुक्तालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर  आला आहे.