…तर मोठी फटाक्यांची माळ लागेल , आता केंद्र सरकारनेच चौकशी करावी – राज ठाकरे

0
368

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – अंबानी यांच्या घराखाली जिलेटिनची गाडी कोणाच्या सांगण्यावरून लावली हा वाटतो तितका सोपा विषय नाही. परमवीर सिंग, संजय वाजे ही प्यादी आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी गोळा करायला सांगितले, मग राज्यातून किती असा प्रश्न आहे. हे सगळेच लज्जास्पद आहे. आता या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारकडून ते होणार नाही. आता केंद्र सरकारनेच यात हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. सखोल चौकशी झालीच तर फटाक्यांची माळ लागेल आणि तुम्ही कल्पना करणार नाही, अशी नावे यतील असेही राज ठाकरे म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ आहे. भाजपाने राज्यभर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आघाडी सरकारवर चहुबाजुंनी टीका होते आहे. ठाकरे याबाबत काय बोलतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, देशाच्या इतिहासात अशी घटना घडली नाही. परमवीर सिंह यांना १ वर्षे झाले असेल. जर का मुंबईतून १०० कोटींचे टार्गेट बार मधून वसूल करण्याचा आदेश राज्याचा गृहमंत्री देतो याचीच लाज वाटते. म्हणजेच वर्षाचे आजवर १२०० कोटी द्यायला हवे होते. गृहमंत्री हा राज्याचा असतो, म्हणजे राज्यातील अन्य शहरांतून किती वसुली व्हायची त्याची माहिती बाहेर आलेली नाही. वाजे हा बॉम्बची गाडी कोणी सांगितल्याशिवाय ठेवेल का हा प्रश्न आहे. हा विषय वाजे व परमवीर सिंह यांच्यापुरता नाही. केंद्र सरकारने यात हस्तेक्षप करावा, महाराष्ट्र सरकारकडून होणार नाही. चौकशी झालीच तर फटाक्यांची माळ लागेल. कोणकोण आत जातील याची कल्पना करू शकणार नाही.

राज ठाकरे म्हणाले, हे सर्व खरे असले तरी मूळ विषय महत्वाचा आहे, तो भरकटता कामा नये. मागे सुशांत सिंह प्रकरणातसुध्दा मूळ विषय भरकटत दुसऱ्याच बाजुला गेला. अशा प्रकारे बातम्या सरकरत जातात. मूळ विषय हा अंबानींच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी ठेवली जाते हा आहे. एक नक्की की, अतिरेकी बॉम्ब ठेवतात असे एकले होते, पण पोलिस बॉम्ब ठेवतात हे कुठे एकले नाही. ते जिलेटीन आले कुठून, त्यात सापडलेली चिठ्ठी ही गुजराथी पध्दतीच्या ढंगातील होती, त्याची चौकशी झाली पाहिजे. मुळात संजय वाजेला हा खाजा इनुस प्रकरणात १७ वर्षे निलंबित होता, ५८ दिवस तो जेलमध्ये होता. त्याने शिवसेनेत प्रवेश केला, त्याला शिवसेनेत कोणी आणले हे समजले पाहिजे. युती सरकारच्या काळात त्याला पुन्हा पोलिस खात्यात आणावे असे स्वतः उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते, हे सगळेच गूढ असल्याचा संशय राज ठाकरे यांनी केला आहे. उध्दव ठाकरे आणि अंबानी यांचे मधूर संबंध आहेत, असे ही राज ठाकरे म्हणाले.