…तर मी स्वतःच खो घालेन; खासदार उद्यनराजेंचा सुचक इशारा

0
502

सातारा,  दि. ३ (पीसीबी) – भाजप प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच त्यांनी भाजपला सुचक इशारा दिला आहे. कोणी मला खो घालायचा प्रयत्न केला, तर मी स्वतःच खो घालेन, त्यामुळे कोणीही त्या विचारात राहू नये,  असे त्यांनी  म्हटले आहे.

खासदार उदयनराजे  यांना दिल्लीत पक्ष प्रवेश हवा आहे, तर त्याप्रमाणे तो होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे. या विधानाचा  खासदार उदयनराजे  यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

मी कधीही नकारात्मक विचार करत नाही, लोकांच्या कल्याणासाठी कायम सकारात्मक विचार करतो. आणि त्यामुळेच मी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. कोणत्या पक्षात जायचे की नाही ते नंतर पाहू. पण गेल्या एवढ्या वर्षापासून मी जेवढ्या योजना आणल्या, त्याला कुणीही साथ दिली नाही. मग अशा लोकांबरोबर कशाला रहायचे, असे म्हणत उदयनराजेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर  निशाणा साधला.