…तर पंतप्रधान मोदी तुरूंगात जातील – राहुल गांधी

0
974

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – राफेल करार हे भ्रष्टाचाराचे ओपन अॅण्ड शट प्रकरण आहे. याप्रकरणी चौकशी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरूंगात जावे लागेल,  असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. वरिष्ठ पत्रकारांसोबत राहुल गांधींनी बैठक  घेतली.  

यावेळी बोलताना  राहुल गांधी म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींना भ्रष्टाचारी म्हटले जात नाही, तर ते भ्रष्टाचारी आहेत. उगाच गोंधळू नका. राफेल हे ओपन अॅण्ड शट प्रकरण आहे. ज्यादिवशी राफेल प्रकरणाचा तपास सुरु होईल, त्यानंतर काही वेळातच नरेंद्र मोदी तुरूंगामध्ये असतील.

फ्रान्समध्ये राफेल प्रकरणी तपासाला सुरुवात झाली  आहे. नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींना फायदा मिळवण्यासाठी प्रक्रिया आणि सर्व कायद्यांचे उल्लंघन  केल्याचा  आरोप  राहुल गांधींनी केला.

दरम्यान, महिला आणि पुरुषांना समान वागणूक दिला पाहिजे. त्यांना प्रत्येक ठिकाणी जाण्याची परवानगी असली पाहिजे, असे मत राहुल गांधी यांनी शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या विषयावर व्यक्त केले.