‘…तर तृप्ती देसाईच्या तोंडाला काळे फासू’

0
257

शिर्डी, दि.२ (पीसीबी) – मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर शिवसेनेकडून तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे.

शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि तोंडाला काळं फासू असा इशारा शिवसेना महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी तृप्ती देसाईंना दिला.

दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं होतं. यावर तृप्ती देसाईंनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर तृप्ती देसाईंविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर तृप्ती देसाई काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.