…तर घरात घुसून मारू; पंतप्रधान मोदींचा इशारा

0
595

पाटणा, दि. ३० (पीसीबी) – देशात दहशत आणि हिंसा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मग ते सीमेपलीकडील असोत  किंवा देशातील  असोत,  ते सर्व  चौकीदाराच्या निशाण्यावर आहेत.  भारताला  धोका पोहोचविल्यास घरात घुसून मारू, असा  सज्जड  इशारा  पंतप्रधान  मोदी यांनी पाकिस्तानचे नांव न घेता दिला. 

बिहारमधील मुजफ्फरपूर येथे लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी  सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मोदींनी देशाच्या शत्रूंना निर्वाणीचा इशारा दिला. तसेच त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला.

मोदी  म्हणाले की,  जे लोक  तुरुंगात, जामीनावर किंवा जामीनासाठी  न्यायालयाच्या  चकरा मारत आहेत, हे सर्व मिळून केंद्रातील मजबूत सरकारला एक मिनिटही सहन करु शकत नाहीत. महाआघाडीवाले   दहशतवादावर काहीही बोलत नाहीत. पाकिस्तानचे  नाव ऐकून  त्यांचे पाय थरथर कापतात आणि यांचे सरकार हालायला लागते, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला.

एनडीए सरकार भ्रष्टाचार हटविणार  म्हणत आहे, तर महाआघाडी मोदींना हटवा म्हणत आहे, असा मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.