तर्पणच्या पाठीशी उभा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
179

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – चांगल्या कामाला पाठबळ दिल्याशिवाय ते उभे राहत नाही. त्यामुळे १८ वर्ष वयाच्या पुढील अनाथ मुलांसाठी तर्पण संस्थेने जे काम हाती घेतले आहे, त्याला महाराष्ट्र शासनाने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून, कोणी काहीही म्हणाले तरी मी स्वतः या कामात तर्पणच्या पाठीशी उभा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जो समाज आणि देशासाठी काम करतो त्यांच्या पाठीशी भगवानगडाचे आशिर्वाद कायम असतात. संत ज्ञानेश्वर माऊलींनी जे कार्य हाती घेतले होते तेच कार्य आज श्रीकांत भारतीय पुढे घेवून जात आहेत असे उद्गार न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी काढले. मुंबईच्या गरवारे क्लब हाऊस मध्ये युवा तर्पण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही विशेष उपस्थिती होरे.नवनाथ महाराज निम्हण आणि मयुरी सुषमा या दोघांना युवा तर्पण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना तर्पणचे कार्यकारी संचालक आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, १८ वर्ष वयाच्या पुढील अनाथ मुलां-मुलींसाठी केवळ जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करुन थांबता येणार नाही तर त्यांच्याशी भावनिक नाते जोडण्याचे काम समाजाला करावे लागेल.

हे काम करण्यासाठी तर्पण फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकले आहे. हे ईश्वरीय कार्य असल्यामुळे ज्या प्रमाणे संत नामदेव महाराजांनी आपल्या हरीच्या दासांसाठी आकल्प आणि अहंकारमुक्त आयुष्य मागितले तीच मागणी आज आम्ही अनाथांचे दास महंत नामदेव शास्त्रींच्या समोर मागत आहोत असे आमदार भारतीय म्हणाले.

या प्रसंगी बोलतांना श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले की, आई-वडिल असतानाही अनाथ झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ निर्माण करुन ते विश्वाची माऊली झाले. त्याच कार्याचा वारसा आज तर्पण संस्थेच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे. ज्या व्यक्ती आणि संस्था समाज, धर्म आणि देशासाठी काम करतात त्यांच्या पाठीशी परमेश्वराचे आशिर्वाद असतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आदर्श तत्वाचे उदाहरण असून आम्ही भगवानगडाच्या माध्यमातून ज्या व्यक्ती ब्रह्मचारी राहून ज्ञानेश्वरीचे अध्ययन करतात त्यांच्यासाठी कायम स्वरुपी निवास आणि भोजन व्यवस्था केली आहे. अनाथ मुलांना समाजाने बळ दिल्यास त्यांच्यातील सामर्थ्य देशकार्यासाठी उपयोगी पडते. हे काम आ. श्रीकांत भारतीय करतात