तडीपार गुंडास भोसरीतून अटक

0
2196

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुंडाला भोसरी एमआयडीसी येथील बालाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने शनिवारी (दि.५) रोजी केली.

दाद्या उर्फ कृष्णा गणेश भोसले (वय २०, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस हवालदार अजय भोसले यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत आरोपी दाद्या हा बालाजीनगर परिसरात आला आहे. यावर खंडणी दरोडा विरोधी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून दाद्याला अटक केली. त्याच्या विरोधात तडीपारीचा आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, किरण काटकर, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.