तंबाखू विक्री प्रकरणी एकास अटक

0
237

रहाटणी, दि. २ (पीसीबी) – जनरल स्टोअर्समध्ये दुकानदाराने विक्रीसाठी तंबाखू ठेवली असल्याचे अण्णा व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत उघडकीस आले. त्याबाबत गुन्हा दाखल करून दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) दुपारी साडेतीन वाजता नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली.

विनोद लालजी मौर्य (वय 30, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी खे. ल. सोनकांबळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मौर्य याचे नखाते वस्ती, रहाटणी येथे विनोद जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाला अन्न व औषध प्रशासन विभागाने भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी दुकानात 52 हजार 50 रुपयांची प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आढळून आली. याबाबत गुन्हा दाखल करून दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी लोहार तपास करीत आहेत.