ड्रॅग्ज प्रकरणी चौकशीत समोर आले नाव, NCBची धाड पडताच हा टीव्ही अभिनेता झाला पसार!

0
348

मुंबई , दि. 3 (पीसीबी) : ड्रग्ज प्रकरणात NCB सध्या अतिशय सक्रिय झाली आहे. एनसीबीने काल रात्री अंधेरीच्या लोखंडवाला भागातील एका टीव्ही अभिनेत्याच्या घरावर छापा टाकला, त्यामध्ये एनसीबीला विविध ड्रग्ज मिळाले आहेत. मात्र, एनसीबीने छापा टाकण्यास सुरुवात करण्याच्या काही मिनिटं आधी हा अभिनेता पसार झाला होता. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेता एजाझ खान याच्या चौकशीनंतर हा छापा टाकण्यात आला होता…
या अभिनेत्यासह त्याच्या घरात एक परदेशी महिला देखील राहत होती. मात्र, ती ही सध्या फरार झाली आहे. एनसीबी सध्या सदर अभिनेता आणि परदेशी महिला या दोघांचा शोध घेत आहेत..
ग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान याला अटक केली होती आणि आता कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (30 मार्च) एजाझ राजस्थानहून मुंबईला परत आला असता, एनसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. एनसीबी टीमने एजाझच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी छापे टाकले.
त्याचवेळी, कोर्टात हजर होण्यापूर्वी अभिनेता म्हणाला होता की, घरावर टाकलेल्या छाप्याच्या दरम्यान 4 झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. या गोळ्या त्याच्या पत्नीला दिल्या गेल्या होत्या. गर्भपात झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि म्हणूनच ती यातली एक गोळी दररोज घ्यायची..
ड्रग पेडलर शादाब बटाटाला अटक झाल्यानंतर एजाझचे नाव या ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. एनसीबीच्या टीमला एजाझ खान आणि बटाटा टोळीचे काही धागेदोरे सापडले होते, त्याची चौकशी केल्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका मोठ्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर फरूख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा याला सुमारे दोन कोटी एमडी ड्रग्जसह अटक केली होती.