डिसेंबरपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल – प्रकाश आंबेडकर

0
353

नवी दिल्ली, दि. 12 (पीसीबी) – “राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या विरोधात कायम भूमिका घेत आहे, त्यामुळे येत्या डिसेंबरपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल,’ असे भाकीतही आंबेडकर यांनी नवी दिल्ली येथे माध्यम प्रतिनिधि बरोबर बोलताना केले. 

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने लॉकडाउन उठविल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी सुरू करण्यास परवानी दिली होती. मात्र, राज्य सरकारने त्यातील काही गोष्टींना विरोध केला. मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णयही राज्याने धुडकावला आहे. 

मोठ्या विरोधानंतरही केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांची अंमलबजावणी करण्यास राज्यातील ठाकरे सरकारने नकार दिला आहे. अशी काही उदाहरणे आहेत की राज्याने केंद्राच्या विरोधात भूमिका घेतली आहे. वास्तविक घटनेनुसार राज्याला केंद्र सरकारविरोधात जाता येत नाही. पण, महाराष्ट्रात तसे घडते आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट अस्तित्वात येईल, असा अंदाज ऍड. आंबेडकरांनी वर्तविला.