‘ठाकरे सरकारनं हा तर मुंबईकरांवर लादलेला बोजा आहे’; रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर भाजप नेत्याची सडकून टीका

0
221

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारनं बोजा लादला आहे’, असं म्हटलंय. कारण, एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार असल्याने ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केलीय.

अतुल भातखळकर यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे कि, ‘खटूवा समितीचा अहवाल ठाकरे सरकारने स्वीकारल्यामुळे 1 मार्चपासून रिक्षा-टॅक्सीच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ होणार आहे. कोरोनामुळे आर्थिकअडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारने हा बोजा लादला आहे. धंदा कमी होईल या भीतीने अनेक रिक्षा-टॅक्सी संघटनांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे.’

‘परिवहन मंत्री अनिल परब यांनी पेट्रोलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करीत असल्याचं जाहीर केलं. परंतु या भाडेवाढीचा पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढीशी काहीही संबंध नाही. मी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020 मध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी खटूआ समितीच्या शिफारशी राज्य सरकारनं स्वीकारल्या असून, भाडेवाढ होणार हे निश्चित असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कोरोनाच्या अगोदरच भाडेवाढ करण्याचे ठाकरे सरकारनं ठरवले होते. त्याचा आता अंमलबजावणी केली जाणार आहे’, असं भातखळकर म्हणाले.

एवढंच नाही तर भातखाल पुढे म्हणाले कि, आपले ग्राहक कमी होतील त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भाडेवाढीला आमचा विरोध असेल असं रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी स्पष्टपणे सांगूनही ही अन्यायकारक भाडेवाढ करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मागील दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला हात टेकवत आहेत.पेट्रोलने तर सेंचुरी मारली. अशावेळी रिक्षा आणि टॅक्सी संघटना भाडेवाढीची मागणी करत होते. त्यासाठी या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. भाडेवाढीच्या निर्णयामुळे या संघटनांना दिलासा मिळाला आहे. पण, आधीच पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.