ट्रॅक्टरखाली चिरडल्याने पाळीव श्वानाचा मृत्यू

0
438

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – ट्रॅक्टरखाली चिरडल्याने पाळीव श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 26) बनकर वस्ती, मोशी येथे घडली.

प्रकाश दत्तात्रय बनकर (रा बनकर वस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ट्रॅक्‍टर चालकाचे नाव आहे. आशिष नवनाथ बनकर (वय 29 रा. बनकर वस्ती, मोशी) यांनी बुधवारी (दि. 29) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष बनकर यांचा श्वान रविवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला झोपला होता. त्यावेळी आरोपी प्रकाश बनकर याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हयगयीने, निष्काळजीपणे चालवला. ट्रॅक्टर खाली आल्याने त्या श्वानाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.