ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन

0
313

गांधीनगर, दि. ३० (पीसीबी) : प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला (वय९०)यांचे शुक्रवारी निधन झालं. बेजान दारुवाला यांनी गुजरातमधील अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. एका आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते. बेजान दारुवाला यांच्या मुलाच्या मते, त्यांना न्युमोनिया झाला होता. तसेच, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही सांगण्यात येते.

बेजान दारुवाला यांचा जन्म 11 जुलै 1931 रोजी झाला. ते पारसी समाजाचे असून त्यांच्या भविष्यासाठी ते लोकप्रिय होते. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची भविष्यवाणी त्यांनी केली होती. इतकंच नाही तर संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू होईल, अशीही भविष्यवाणी त्यांनी केली होती. 23 जून 1980 रोजी संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याशिवाय, त्यांनी कारगिल युद्ध ते गुजरात भूकंप आणि 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत येण्यापूर्वी मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती.

अनेक वर्तमानपत्रात ज्योतिषी कॉलम लिहिणारे दारुवाला यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या शास्त्रांच्या माध्यमातून भविष्यवाणी करायचे. ते वैदिक ज्योतिष, न्यूमरोलॉजी, हस्तरेषा पाहणे यासह अनेक शास्त्रांमध्ये तज्ज्ञ होते. ते शेअर मार्केटबाबतही भविष्यवाणी करायचे. त्यांच्या वेबसाईटनुसार ते अमेरिकेचे सर्वश्रेष्ठ ज्योतिषी होते.