“ज्यांचा मुख्यमंत्री त्यांनाच भोपळा आणि मित्र पक्षानीच…..” ; भाजप नेत्याचा ठाकरेंना सणसणीत टोला

0
142

मुंबई, दि.४ (पीसीबी) : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा दणका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं सामना करावा लागला आहे. दरम्यान, यानंतही भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

“ठीक आहे आम्ही कमी पडलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा…मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा.. बाकी मैदानात परत भेटूच,”असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरें वरती निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाला केवळ १ आणि महाविकास आघाडीला ५ जागांवर विजय मिळवता आला आहे. पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.