ज्ञानव्यापी प्रकऱणी आता २२ सप्टेंबरला सुनावणी

0
307

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय वाराणसी कोर्टानं दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. ज्ञानवापी प्रकरणी 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयानं हिंदू पक्षकाराच्या बाजून निकाल देत सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणावर जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, या वादावर सुनावणी केली जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 तारखेला होणार आहे. न्यायालयाने सांगितले की राखी सिंह विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य केस न्यायालयात चालविण्यायोग्य आहे. असा निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मस्जिद कमिटीचा अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.

जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी, रेखा आर्या आणि मंजू व्यास या 5 पैकी 3 फिर्यादी देखील पोहोचल्या होत्या. केवळ 40 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला होता.