‘जैश –ए- मोहम्मद’चा मास्टर माईंड मसूद अझरचा ठावठिकाणा लागला    

0
718

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) –  पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर   हल्ला घडवून आणणाऱ्या ‘जैश –ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा मास्टर माईंड मौलादा मसूद अझर याचा ठावठिकाणा गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भारत बालाकोट हल्ल्यानंतर  मसूद अझरवर स्ट्राइक करण्याची शक्यता आहे. 

सॅटेलाईटच्या  सहाय्याने गुप्तचर यंत्रणांनी मसूदचा पत्ता शोधण्यात यश मिळवले आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले होते. त्याप्रमाणे भारत कारवाई करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर  तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी  पाकव्याप्त काश्मीरमध्ये  घुसून एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या तळावर फेकले. या हल्ल्यात ३५० दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईनंतर पाकिस्तान भेदरला असून त्याच्याकडून आगळीक होण्याची शकयता असल्याने भारताच्या तिन्ही सैन्य दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.